S M L

काळबादेवीमध्ये इमारतीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही

Sachin Salve | Updated On: Jul 23, 2015 09:27 PM IST

काळबादेवीमध्ये इमारतीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही

23 जुलै : मुंबईच्या काळबादेवी परिसरात स्वदेशी मार्केटच्या धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला. दोन इमारतींना जोडणारा मधला भाग हा काही दुकानांवर कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण दुकानांचं मात्र काही प्रमाणात नुकसान झालंय.

हे मार्केट 100 वर्षं जुनं असून बिल्डरनं दुर्लक्ष केल्यानं ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक दुकानदारांनी केलाय. महिन्याभरापूर्वी काळबादेवीमध्ये इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत अग्निशमन दलाच्या चार अधिकार्‍यांचा मृत्यू झाला होता. महिना उलटत नाही तेच पुन्हा एकदा इमारत दुर्घटनेची घटना घडलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2015 09:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close