S M L

गोंदिया आणि भंडार्‍यात भूकंपाचे सौम्य धक्के

Sachin Salve | Updated On: Jul 23, 2015 10:35 PM IST

गोंदिया आणि भंडार्‍यात भूकंपाचे सौम्य धक्के

23 जुलै : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. भूकंपामुळे काही घरांना भेगा पडल्या आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आज (गुरुवारी) संध्याकाळी आठ वाजून 5 मिनिटांनी आणि 8 वाजून 8 मिनिटांनी अचानक भूगर्भात आवाज होऊन भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. गोंदियात आलेल्या भूकंपात जिल्ह्यातील 8 ही तालुक्यात तर भंडारा जिल्ह्यातील लाखांनी, साकोली ,लाखांदूर आणि तुमसर तालुक्यात या भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंप येताच लोकांनी घाबरून घराबाहेर पळ काढला होता. सध्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात भूकंप मोजण्याचे यंत्र नसल्यामुळे भूकंपाची तीव्रता किती होती हे सांगण्यास कुठलाही अधिकारी तयार नाही. जिल्ह्यातील काही तालुक्यात घरांना भेगा पडल्या आहेत. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2015 10:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close