S M L

'नासा'ने शोधला पृथ्वीशी मिळताजुळता ग्रह

Samruddha Bhambure | Updated On: Jul 24, 2015 10:31 AM IST

'नासा'ने शोधला पृथ्वीशी मिळताजुळता ग्रह

24 जुलै : गेल्या शेकडो वर्षांपासून मानव अंतराळात ज्याचा शोध घेत आला, तो 'नासा'च्या एका नव्या संशोधनामुळे आता नजरेत आला आहे. 'नासा'ने 1400 प्रकाशवर्ष दूर असलेला एक ग्रह शोधला असून, त्याचे अवकाश गुणधर्म पृथ्वीशी मिळतेजुळते आहेत. दुसरी पृथ्वी म्हणजे असा ग्रह जिथे जीवसृष्टी असेल किंवा जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण असेल, अशाच एका ग्रहाचा नासाने आता शोध लागला आहे.

'नासा'च्या 2009 सालपासूनच्या शोधमोहिमेला अखेर यश आले असून, केपलरस्केप दुर्बिणीने या पृथ्वीसदृश ग्रहाचा शोध लावला आहे. केपलर 452बी असे या ग्रहाचे नाव ठेवण्यात आले असून, त्याचा पृष्ठभाग पृथ्वीप्रमाणेच आहे. पृथ्वीप्रमाणेच हा ग्रह एका सूर्यासारख्या तार्‍याभोवती निश्चित कक्षेत प्रदक्षिणा घालतो. तसेच त्याचा पृष्ठभाग खडकाळ आहे. विशेष म्हणजे हा ग्रह अधिक उष्णही नाही किंवा अधिक शीतही नाही!

हा ग्रह सिग्नस तारकासमूहात आहे. या ग्रहावर पाणी असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. असं असलं तर या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही तार्‍यापासून त्याचा उपग्रह एका विशिष्ट अंतरावर असला तर त्या ग्रहावर जीवसृष्टी निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. या अंतराला 'हॅबिटेबल झोन'म्हणतात. आपल्या सूर्यमालेत पृथ्वी अशा 'हॅबिटेबल झोनमध्ये आहे. तसंच हा नवा ग्रहही त्याच्या सूर्यापासून 'हॅबिटेबल झोन'मध्ये आहे. त्यामुळे 'केप्लर' ग्रहाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2015 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close