S M L

कांदा करणार वांदा, भाव 18 रुपयांवरून 30 रुपयांवर !

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2015 05:08 PM IST

कांदा करणार वांदा, भाव 18 रुपयांवरून 30 रुपयांवर !

onion3452324 जुलै : पावसाळ्याच्या हंगामात यंदा पुन्हा कांदा वांदा करण्याच्या तयारीत आहे. गेल्या दोन दिवसांत कांद्याचे भाव कमालीचे वाढले आहे. कांद्याचा घाऊक भाव 18 रुपयांवरून 30 रुपये प्रति किलोवर गेले आहेत. किरकोळ बाजारात कांदा 35 ते 40 रुपये किलो मिळतोय. गेल्या दोन वर्षांतले हे सर्वात जास्त भाव आहेत. एवढंच नाही तर येत्या काही दिवसांमध्ये कांदा आणखी महाग होण्याची दाट शक्यता आहे.

कांद्याची परिस्थिती अशीच राहिली तर कांदा आयात करावा लागेल का ?, याबाबत दिल्लीत विचार केला जातोय. दिल्लीच्या किरकोळ बाजारातही कांदा 40 रूपयांपर्यंत पोहचलाय. देशातल्या अनेक भागांमध्ये पाऊस न पडल्यामुळे कांद्याची आवक घटलीय, पण मागणी तेवढीच आहे त्यामुळे हे भाव वाढतायत. देशात कांदा महाराष्ट्रात सर्वात जास्त होतो. राज्यात जवळपास 33 टक्के कमी पाऊस पडलाय. कर्नाटकातही जवळपास 25 टक्के कमी पाऊस झालाय. त्यात साठेमारीची भर. यामुळे इतर भाज्यांचे भावही वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईतील एपीएमसी मार्केट्समध्ये कांद्याचे भाव गुरुवारी अचानक 18 रूपये किलोवरून 30 रूपये किलो झाले. आज हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात आज 35 ते 40 रूपये किलोने कांदा विकला गेला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2015 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close