S M L

'महालक्ष्मी'च्या संवर्धनाचं काम त्वरित सुरू करा : कोर्ट

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2015 06:54 PM IST

'महालक्ष्मी'च्या संवर्धनाचं काम त्वरित सुरू करा : कोर्ट

24 जुलै : कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातल्या संवर्धनावर सुरू असलेल्या वादात आता न्यायालयानं पुरातत्व खात्याला फटकारलंय. त्वरित संवर्धनासाठीचं काम सुरू करावं आणि सोमवारपर्यंत मूर्तीच्या संवर्धनाला उशीर का झाला याचा खुलासा करावा असे आदेश कोर्टाने दिले आहे.

बुधवारपासून महालक्ष्मीच्या मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया सुरू झाली होती. पण त्यानंतर हिंदू जनजागरण समितीनं आक्षेप घेत संवर्धन प्रक्रियेला विरोध केला. त्यामुळंच पुरातत्व खात्याचं पथकं औरंगाबादमधून कोल्हापूरमध्ये आलं नाही अशी चर्चा होती. पण संवर्धनाबाबत काल कोल्हापूर सत्र न्यायालयात श्रीपूजक आनंद मुनीश्वर यांनी पुर्नयाचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत जिल्हा सत्र न्यायालयानं पुरातत्व खात्याला विचारणा केली.

त्यावेळी निधी नसल्यानं औरंगाबादचं पथक आलं नसल्याचं स्पष्टीकरण पुरातत्वच्या अधिकार्‍यांनी दिल्यावर निधी उपलब्ध होईल पण त्वरित संवर्धनासाठीचं काम सुरू करावं तसंच येत्या सोमवारपर्यंत पुरातत्व खात्यानं याबाबत खुलासा करावा असा आदेशही दिलाय. त्यामुळं आज रात्रीपर्यंत पुरातत्व खात्याचं पथकं कोल्हापूरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान श्रीपूजक आजही आपल्या भूमिकेवर ठाम असून धार्मिक विधी नियोजित वेळेप्रमाणं सुरू आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2015 06:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close