S M L

तावडेंचा अजब बचाव, गरीबाच्या मुलाची थट्टा करू नका !

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2015 08:07 PM IST

तावडेंचा अजब बचाव, गरीबाच्या मुलाची थट्टा करू नका !

24 जुलै : बोगस डिग्री प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे विरोधकांच्या मार्‍यामुळे पुरते हैराण झालेत. माझे वडील गरीब होते. पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांच्या वडलांसारखे श्रीमंत नव्हते जर असते तर विदेशात जाऊन शिकलो असतो. पण गरीब घरात शिकलेल्या मुलाची थट्टा का करता असा अजब बचाव विनोद तावडेंनी अधिवेशनात केलाय. तावडेंच्या पाठीशी मुख्यमंत्रीही मैदानात उतरले आणि कर नाही तर डर कशाला ?, अशी भक्कम बाजूच मांडली.

आज अधिवेशनात चांगलाच गोंधळ पाहण्यास मिळाला. विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये उभा सामनाच रंगला होता. विरोधकांनी बोगस डिग्री प्रकरणी विनोद तावडे आणि चिक्की घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडेंचा राजीनाम्याची मागणी आजही लावून धरली. अधिवेशनात विरोधकांनी चक्क 'पंकू चिक्की' विकून अनोखं आंदोलन केलं. सभागृहाबाहेर अशी आंदोलनं सुरू असतांना सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली.

विनोद तावडेंचा बचाव

"माझे वडील गरीब होते, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांच्या वडलांसारखे श्रीमंत नव्हते जर असते तर विदेशात जाऊन शिकलो असतो. पण, गरीब घरातला मुलगा शिकतो त्याच्या शिक्षणाची थट्टा उडवली जाते. तुमच्या वडलांकडे पैसा होता म्हणून तुम्हाला विदेशात शिकवलं. माझे वडील गरीब सरकारी नोकर होते. तुम्ही विदेशात शिकलात मग गरीब मुलाची थट्टा का उडवता अशी भावनात्मक बचाव विनोद तावडेंनी केला.

जयंत पाटलांची फटकेबाजी

"प्रश्न हा बोगस डिग्रीचा आहे. कुणाकडे किती पैसे आहे हा विषयच नाही. बोगस डिग्री घेऊन मंत्रिपदावर विराजमान राहता. अगोदर मंत्रिपद सोडा मग बोला. राज्य सरकारने या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे असा पलटवार जयंत पाटील यांनी केला.

मुख्यमंत्री आले धावून

जयंत पाटलांच्या उत्तरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही चांगलेच भडकले. ज्यांच्यावर आरोपांची राळ आहे ते विनोद तावडेंवर आरोप करत आहे. आम्हाला शिकवू नका, हे सरकार पारदर्शी सरकार आहे. आघाडी सरकारने हजारो कोटींची खरेदी रेट कॉन्ट्रक्ट नुसार केलीये.

कुणीही इथं एखाद्याला टार्गेट करू शकत नाही. आदर्श प्रकरणात काय झालं होतं ते सांगू का ? असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला. तसंच कर नाहीतर डर नाही ?, विरोधक केवळ आरोप करत आहे म्हणून राजीनामा देऊ ही भाबडी भावना असेल तर हे शक्य नाहीये असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2015 07:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close