S M L

'महालक्ष्मी'च्या संवर्धनाला रविवारचा मुहूर्त, पुरातत्त्व खात्याचे पथक रवाना

Sachin Salve | Updated On: Jul 24, 2015 10:20 PM IST

kolhapur mahalaxmi424 जुलै : न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर पुरातत्त्व खात्याचे अधिकारी कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. आज रात्री अधिकारी कोल्हापुरात दाखल होतील आणि उद्या मूर्तीचा पाहणीकरून रविवारपासून संवर्धनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. मात्र, अद्यापही हिंदू जनजागरण समितीने विरोध कायम ठेवलाय.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातल्या संवर्धनाचा वादाची एक बाजू अखेर न्यायालयात मिटली. त्वरित संवर्धनासाठीचं काम सुरू करावं तसंच येत्या सोमवारपर्यंत पुरातत्व खात्यानं याबाबत खुलासा करावा असा आदेश दिलाय. न्यायालयाच्या आदेशानंतर पुरातत्त्व खात्याचं पथक कोल्हापूरकडे रवाना झालंय.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात मूर्तीवर रासायनिक प्रक्रियेला रविवारी सकाळी सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया करणारं पुरातत्त्व विभागाचं पथक आज दुपारी औरंगाबादहून रवाना झालं. ते आज रात्री उशिरा कोल्हापुरात पोहोचेल. उद्या पाहणी केल्यानंतर ते रविवारपासून प्रत्यक्ष संवर्धन प्रक्रियेला सुरुवात करणार आहेत. या पथकात आठजणांचा समावेश आहे.

त्यात दोन आर्टीस्ट, दोन मूर्तीकार, एक फोटोग्राफर आणि एक रसायन शास्त्रज्ञ आहे. हे पथक 8 ते 10 दिवस महालक्ष्मीच्या मूर्तीवर काम करणार आहेत. दरम्यान, या प्रक्रियेला आमचा विरोध असेल, अशी भूमिका हिंदू जनजागरण समितीनं कायम ठेवली आहे. समितीच्या भीतीमुळे दोन दिवस पुरातत्त्व विभागाचं पथक कोल्हापुरात आलंच नव्हतं. अखेरीस, कोर्टाने तंबी दिल्यानंतर हे पथक औरंगाबादहून रवाना झालं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2015 10:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close