S M L

पवारांवर टीका केल्याशिवाय नेत्यांना मोठेपण मिळत नाही -सुप्रिया सुळे

Sachin Salve | Updated On: Jul 25, 2015 01:24 PM IST

`1supriya_sule25 जुलै : शरद पवार साहेबांवर टीका केल्या शिवाय नेत्यांना मोठेपण मिळत नाही आणि चॅनलवरही हेडलाईन होत नाही त्यामुळे पवार साहेबांवर बिनबुडाचे आरोप होत असतात अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपचे आमदार अनिल गोटेंना उत्तर दिलंय.

आरोपात तथ्य असेल तर पुरावे सादर करा नसता अशा आरोपांना राष्ट्रवादी महत्व देत नाही असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

अनिल गोटे यांनी छगन भुजबळ आणि शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे औरंगाबादेत तंबाखू विरोधी  रँलीसाठी औरंगाबादेत आल्या होत्या. यावेळी त्यांनी हा पलटवार केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2015 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close