S M L

नागपूर हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

7 डिसेंबर मंगळवारपासून सुरू होणारं नागपूर हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरण्याची शक्यता आहे. राम प्रधान समितीचा फुटलेला अहवाल, 'फियान'ग्रस्तांना मदत, कापसाचा भाव आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या अशा प्रश्नांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हे आहेत. 26/11 च्या हल्ल्याचं भूत काही केल्या राज्य सरकारची पाठ सोडत नाही. तर रामप्रधान समितीचा अहवाल फुटल्यामुळे राज्य सरकार तोंडघशी पडलं आहे. राम प्रधान समितीचा अहवाल फुटल्याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव आणि राम प्रधान यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्याचा इशारा याआधीच विरोधकांनी दिला आहे. तर 'फियान'ग्रस्तांना मिळालेली तुटपुंजी मदत, पोलिसांमधील गटबाजी, आरोप-प्रत्यारोप, 'आयबीएन लोकमत'वरील हल्ला, विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि कापसाला वाढीव भाव असे विविध विषय घेऊन विरोधक आक्रमक होणार आहेत. विरोधकांच्या रोशाला सामोरं जाताना सरकारला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. अधिवेशनाच्या सुरक्षेची जबाबदारी फोर्स वनकडे नागपूरमध्ये सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेची जबाबदारी फोर्स वन कडे आहे. दहशतवाद्यांचा धोका आणि घातपाताची शक्यता लक्षात घेऊन ही खबरदारी देण्यात आली आहे. त्यासाठी फोर्स वनच्या दोन कंपन्या नागपूरात दाखल झाल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2009 10:19 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2009 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close