S M L

'वन रँक वन पेन्शन'साठी अण्णांचं जंतर मंतरवर पुन्हा एल्गार

Samruddha Bhambure | Updated On: Jul 26, 2015 08:04 PM IST

'वन रँक वन पेन्शन'साठी अण्णांचं जंतर मंतरवर पुन्हा एल्गार

26  जुलै : 'वन रँक वन पेन्शन'च्या मागणीसाठी नवी दिल्लीत आज सकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्त्वाखाली माजी सैनिक आणि लष्करी अधिकारी यांनी मॅराथॉनचं आयोजन केलं होतं

येत्या दोन महिन्यांत वन रँक वन पेन्शन लागू करा. सरकारने जर आपली आश्वासनं पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न केले नाही, तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा अण्णा यांनी सरकारला दिला आहे. तसेच येत्या दोन महिन्यांत देशभरात यासाठी जनजागृती करण्यात येणार असून 2 ऑक्टोबरला ते दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलनदेखील करणार आहेत. गेल्या 5 दिवसांपासून संसद ठप्प आहे. एका दिवसाचा संसदेचा खर्च किती आहे, यात कोणाचा पैसा वाया जात आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसंच जर खासदार जनतेचा पैसा वाया घालवू शकतात, तर माजी सैनिकांना त्यांच्या हक्काचे पैसे का मिळू नयेत, असा सवाल अण्णांनी केला. ते याबाबत पंतप्रधानांना पत्रही लिहिणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2015 05:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close