S M L

फूटपाथ अपघात प्रकरणी सलमानचा जामीन रद्द करा- आशिष शेलार

Samruddha Bhambure | Updated On: Jul 26, 2015 08:07 PM IST

फूटपाथ अपघात प्रकरणी सलमानचा जामीन रद्द करा- आशिष शेलार

26  जुलै : याकूब मेमनच्या फाशीविरोधातील ट्विटमुळं टीकेचा धनी ठरलेल्या सलमानवर सर्व स्तरातूर टिकेची झोड उठवली जात असताना भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सलमानचा जामीन रद्द व्हावा, अशी मागणी केली आहे. या मागणीचे पत्रही शेलार यांनी राज्यपाल सी.व्ही. राव यांना पाठवले आहे.

'सलमान खान हा स्वत: दोषी असून त्याची दुसर्‍या दोषीची शिक्षा माफ करण्याची मागणी आहे, यातून सलमानने सुप्रीम कोर्टाचा अवमान केला आहे' असं शेलार यांनी म्हटलं आहे. सलमान खानला सुप्रीम कोर्ट आणि कायद्याबाबत आदर नाही. एकप्रकारे सलमान खान गुन्ह्याला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे त्याचा जामीन रद्द करायला हवा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

'याकूबच्या ऐवजी टायगरला फाशी द्या,' असं सांगणारी तब्बल 14 ट्विट्स काल मध्यरात्री सलमाननं केली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2015 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close