S M L

पंढरपूरमध्ये चेंगराचेंगरीत एक भाविकाचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Jul 27, 2015 09:45 PM IST

पंढरपूरमध्ये चेंगराचेंगरीत एक भाविकाचा मृत्यू

27 जुलै : एकादशीनिमित्त अवघ्या महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी विठूरायाच्या भेटीच्या ओढीनं पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. वारीला गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र तरीही सोमवारी अफवा पसरल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविकाला जीव गमवावा लागला.

वारकरी जल्लोषामध्ये झेंडे फडकवत असताना झेंड्यामध्ये विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का शिरल्याची अफवा पसरली आणि एकच गोंधळ उडाला. यात झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविकाला जीव गमवावा लागला. यात 3 वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून 12 वारकरी किरकोळ जखमी आहेत, त्यांच्यावर पंढरपूरमध्येच उपचार सुरू आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2015 07:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close