S M L

डॉ. अब्दुल कलामांच्या श्रद्धांजलीवरूनही पक्षीय राजकारण

Samruddha Bhambure | Updated On: Jul 28, 2015 07:38 PM IST

डॉ. अब्दुल कलामांच्या श्रद्धांजलीवरूनही पक्षीय राजकारण

28 जुलै : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभेत आणि विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव ठेवला. यावेळी कलाम यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं पक्षीय राजकारणच समोर आलं.

डॉ. कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. त्यानंतर अगदी थोड्या वेळातच विधान परिषदेत शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी डॉ. कलाम यांची जयंती विज्ञान दिन असावा अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी रावते यांच्या मागणीला पाठिंबा दिला, तसंच कलाम यांच्या जयंतीला अंधश्रद्धा निर्मुलन प्रसार दिन साजरा करावा अशी मागणी केली.

दुसरीकडे कोस्टल रोडला डॉ. कलाम यांचं नाव द्यावं अशी मागणी समाजवादी पक्षाच्या अबु आझमी आणि काँग्रेसचे नसीम खान यांनी केली. यापूर्वी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी कोस्टल रोडला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे. त्यामुळे अबू आझमी आणि नसीम खान यांच्य मागणीनं नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

पक्षीय राजकारण

- डॉ. कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याची शिक्षणमंत्र्यांची घोषणा

- डॉ. कलाम यांच्या जयंतीला विज्ञान दिन साजरा करण्याची दिवाकर रावते यांची मागणी

- राष्ट्रवादीच्या हेमंत टकले यांचा रावते यांना पाठिंबा

- कलाम यांच्या जयंतीला अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रसार करण्याची टकले यांची मागणी

- कोस्टल रोडला डॉ. कलाम यांचं नाव देण्याची अबू आझमी आणि नसीम खान यांची मागणी

- कोस्टल रोडला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची शिवसेना नेत्यांची जुनी मागणी

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2015 07:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close