S M L

डॉ. कलामांचं कार्य करोडो भारतीयांसाठी प्रेरणादायी -बराक ओबामा

Sachin Salve | Updated On: Jul 29, 2015 09:58 AM IST

डॉ. कलामांचं कार्य करोडो भारतीयांसाठी प्रेरणादायी -बराक ओबामा

obama on kalam29 जुलै : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. कलाम यांना 'लोकांचे राष्ट्रपती' हे नाव अगदी योग्य आहे. नम्रता आणि चिकाटी हे त्यांच्यातले गुण लाखो भारतीयांना आणि जगभरातल्या चाहत्यांना प्रेरणादायी ठरले आहे अशी भावना ओबामांनी व्यक्त केली.

ओबामा म्हणतात,

"अमेरिकेच्या जनतेच्या वतीनं मी, कलामांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. कलाम खडतर परिस्थितीतून येऊन भारताचे सर्वोच्च नेते बनले. त्यांनी भारतात आणि परदेशातही मानसन्मान मिळवला.

भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी दृढ होण्याला त्यांचा पाठिंबा होता. 1962 साली त्यांनी नासाला भेट दिली होती, आणि तेव्हापासून भारत आणि नासाचं नातं जुळलं. लोकांचे राष्ट्रपती हे नाव अगदी योग्य आहे. नम्रता आणि चिकाटी हे त्यांच्यातले गुण लाखो भारतीयांना आणि जगभरातल्या चाहत्यांना प्रेरणादायी ठरले."

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2015 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close