S M L

नवी मुंबईत इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jul 29, 2015 12:44 PM IST

नवी मुंबईत इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू

29 जुलै : नवी मुंबईतील करावे गावातील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू झालाय. तर 3 जण जखमी झालेत. जखमींवर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

अनधिकृतरित्या उभारण्यात येणार्‍या इमारतीचा काही भाग शेजारील घरावर कोसळला यामध्ये महेंद्र खंदारे आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी परी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी रंजना आणि 7 वर्षाचा मुलगा संघरत्न हे जखमी आहेत. या घटनेतनंतर नवी मुंबईतील गावांमधून सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीच्या सुरक्षेची प्रश्न पुन्हा समोर आलाय. अशा इमारतीमुळे निष्पाप जिवांचे बळी जात आहेत. याला जबाबदार कोण असा सवाल नवी मुंबईकर करत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2015 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close