S M L

पावसाळी अधिवेशनाचे सूप आज वाजणार !

Sachin Salve | Updated On: Jul 31, 2015 10:20 AM IST

vidhan31 जुलै : अभुतपूर्व असा गाजलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (शुक्रवारी) शेवटचा दिवस आहे. फडणवीस सरकार विरुद्ध विरोधक असा खडा सामना अधिवेशनात पाहण्यास मिळाला. अखेर आज या वादळी अधिवेशनाचं सूप वाजणार आहे.

विरोधकांनी लावलेली कायदा सुव्यवस्थेची चर्चा, विरोधकांच्या वतीनं मांडण्यात आलेले मराठवाडा आणि विदर्भासह अनेक प्रश्नांच्या संदर्भात झालेली चर्चा यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर देणार आहे. तसंच राज्य सरकारची असलेली महत्वाची विधेयकं, विभानसभेत पारीत झालीत अशी विधेयकं, विधानपरिषदेत मंजूरीसाठी आलीयेत. ती विधेयकं मंजूर करुन घेण्यासाठी बहुमताची गरज आहे. हे बहुमत काँग्रेस राष्ट्रवादीकडे असल्यानं सरकार विधेयकं कसं मंजूर करुन घेतंय याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2015 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close