S M L

जिल्हाधिकार्‍यांना कसली मस्ती आलीये, विठ्ठलाच्या शासकीय पूजेवरून दादा भडकले

Samruddha Bhambure | Updated On: Jul 31, 2015 05:42 PM IST

जिल्हाधिकार्‍यांना कसली मस्ती आलीये, विठ्ठलाच्या शासकीय पूजेवरून दादा भडकले

ÖêêßÖêÝÖ¦üßÆü531 जुलै : आमदार रमेश कदम प्रकरणी अजित पवारांनी वड्याचं तेलं वांग्यावर काढलं आहे. आषाढीला पंढरपूरमध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांच्या मुजोरीमुळे पांडुरंगाची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रतीक्षा करावी लागली. या जिल्हाधिकार्‍यांना कसली मस्ती आली आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज विधानसभेत विचारला आहे. याप्रकरणावरून ते सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांवर सभागृहात भडकले होते.

सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे सपत्नीक आतमध्ये पूजा करत बसल्याने मुख्यमंत्र्यांना 20 मिनिटे थांबावं लागलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर कासवाची पूजा करण्याची वेळ आली. या मुजोर जिल्हाधिकार्‍याला एवढी मस्ती कसली आली आहे, असं पवार म्हणाले. आषाढीला राज्यातील 11 कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून महापूजेचा पहिला मान हा मुख्यमंत्र्यांचा असतो, ही प्रथा आहे. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच ही प्रथा पाळली गेली नाही, असा आरोपही पवारांनी केला. जिल्हाधिकार्‍यांच्या या वागण्यामुळे महसूलमंत्री खडसे तर एवढे संतापले की ते पूजा न करताच परत जायला निघाले. पण नंतर त्यांची समजूत काढण्यात आली, अशी माहिती पवार यांनी दिली. सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी आपले अधिकार वापरत हवे थांबवायलं हवं होतं, असंही ते म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2015 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close