S M L

FTII च्या विद्यार्थ्यांचं चलो दिल्ली, सोमवारपासून दिल्लीत आंदोलन

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2015 04:57 PM IST

ftii student343401 ऑगस्ट : पुण्यातीलफिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी आता चल्लो दिल्लीचा नारा दिलाय. येत्या 3 ऑगस्ट म्हणजे सोमवारपासून विद्यार्थी नवी दिल्लीत आंदोलन करणार आहे.

एफटीआयआयचे नवे संचालक गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. चौहान हे या पदासाठी योग्य नाहीयेत. चित्रपटसृष्टीत अनेक कार्यक्षम आणि दिग्गज लोक आहेत त्यांना संचालक म्हणून आणा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा 51 वा दिवस आहे. आतापर्यंत त्यांच्या आंदोलनाला सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी पाठिंबा दिलाय. काल शुक्रवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एफटीआयआयमध्ये जाऊन भेट घेतली आणि पाठिंबा दर्शवला. राहुल गांधी यांच्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता पुन्हा एकदा नव्याने जोम घेतलाय. येत्या सोमवारी विद्यार्थी दिल्लीत आंदोलन करणार आहे. विशेष म्हणजे गजेंद्र चौहान यांना अनेक दिग्गजांनी पायउतार व्हावं असा सल्ला दिला पण तरीही त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळेच पुण्यातील 'महाभारत' आता राजधानी दिल्लीत काय वळणं घेणार हे पाहण्याच ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2015 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close