S M L

आता कोल्हापुरात पोलिसांकडून कामगारांना अमानुष मारहाण

Sachin Salve | Updated On: Aug 1, 2015 09:29 PM IST

आता कोल्हापुरात पोलिसांकडून कामगारांना अमानुष मारहाण

kolhapur police01 ऑगस्ट : बीडमध्ये पोलिसांनी शेतकर्‍याला मारहाण केल्याची घटना ताजी असताना सोलापुरातही पोलिसांच्या दंडेलशाहीच प्रकरण समोर आलंय. चोरीच्या संशयावरून चौकशीसाठी बोलावलेल्या कामगारांना पोलिसांनीच अमानुषपणे मारहाण केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडलीय.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी 4 कामगारांना बेदम मारहाण केली. या चौघांवर कोल्हापूरमध्ये सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे चार कामगार महामार्गावर कणेरीवाडी इथं एका पेट्रोल पंपावर काम करतात. या पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या एका ट्रक मधुन 8 जुलै रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पेट्रोल पंपावर काम करणार्‍या 4 कामगारांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं.

मात्र यावेळी गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप या कामगारांनी केलाय. या घटनेवरून कोल्हापूरमध्ये संताप व्यक्त होतोय. ह्या कामगारांच्या गावचे म्हणजेच गगनबावडा तालुक्यातील किरवे गावचे ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी इंजेक्शन देवून मारहाण केली तसंच गुप्तांगवर पण जोरदार मारहाण केल्याचा आरोप ह्या कामगारांनी केलाय. दरम्यान, पोलीस यावर काहीही बोलण्यास तयार नाहीयेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2015 09:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close