S M L

ऑक्सिजनअभावी सायकलपटू हर्षल पूर्णपत्रे यांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Aug 2, 2015 06:44 PM IST

ऑक्सिजनअभावी सायकलपटू हर्षल पूर्णपत्रे यांचा मृत्यू

02 ऑगस्ट : नाशिकमधील राष्ट्रीय स्तरावरील सायकलपटू हर्षल पूर्णपत्रे यांचा यांचा मनाली-लेहच्या सायकल मोहिमेवर असताना ऑक्सिजनअभावी दुर्देवी मृत्यू झाला आहे. परवा म्हणजे शुक्रवारी मनाली ते लेह-लडाख मार्गावरच्या प्रवासात त्यांचा मृत्यू झाला. एक उत्कृष्ट सायकलपटू हरपल्याने नाशिकमध्ये शोककळा पसरली आहे.

आपल्या काही सहकार्‍यांसोबत 25 जुलैला हर्षद सायकल मोहिमेवर निघाले होते. प्रवासादरम्यान ऑक्सिजनअभावी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

सात वर्षांपूर्वी नाशिकमध्ये सायकलची संघटना स्थापन झाली, तेव्हा हर्षल यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. अल्पावधीतच त्यांनी नाशिकचं नाव राष्ट्रीय स्तरावर झळकावलं. नाशिक ते मुंबई, मुंबई ते दिल्ली तसचं मुंबई ते कन्याकुमारी अशा अनेक खडतर मोहिमा त्यांनी याआधी पार पाडल्या होत्या. मूळ नाशिकचे असणारे हर्षद पूर्णपात्रे हे समाजसेवक डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांचे चिरंजीव आहेत. लेह - लडाखची मोहीम यशस्वी करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र या मोहिमेदरम्यान लेह मार्गावर पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, नाशिकमध्ये आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2015 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close