S M L

कोल्हापूरमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार

Samruddha Bhambure | Updated On: Aug 2, 2015 08:59 PM IST

कोल्हापूरमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार

02 ऑगस्ट : कोल्हापूरमध्ये ऑक्टोबरमध्ये होणार्‍य महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे. कोल्हाूपरमधल्या शासकिय विश्रामगृहावर जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकार्‍यांची रविवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणूक ही स्थानिक ताराराणी आघाडीसोबत लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत रविवारी एक बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जिल्ह्यातले शिवसेनेच आमदार, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनपा निवडणुकीत सर्व म्हणजेच 81 जागा शिवसेना लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तसंच वेळ आली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि RPIला सोबत घेऊ पण मनसेला सोबत घेणार नसल्याचं दूधवडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2015 08:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close