S M L

नाशिक जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग अयशस्वी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 3, 2015 03:36 PM IST

नाशिक जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग अयशस्वी

03 ऑगस्ट : पावसाने पाठ फिरवल्याने हताश झालेल्या शेतकर्‍यांचा कृत्रिम पावसानेही अपेक्षाभंग केला आहे. नाशिकमधील सायगावमध्ये आज (सोमवारी)कृत्रिम पाऊस पाडण्याचा पहिला प्रयोग अयशस्वी ठरला आहे. ढगांची स्थिती योग्य नसल्यानं हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. आता ऊन पडल्याने प्रयोग तूर्तास थांबवण्यात आला आहे.

दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या शेतकर्‍यांना काहीसा दिलासा देण्यासाठी मुंबईच्या इंटरनॅशनल स्कुल ऑफ प्रोफेशनल स्टडिज (आयएसपीएस) या संस्थेने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आशेचा किरण दिसत आहे. योग्य वातावरण नसल्याने आम्ही कृत्रिम पाऊस पडण्यास अपयशी ठरलो. मात्र, दोन आठवड्या नंतर पुन्हा याच ठिकाणी येऊन आम्ही पुन्हा प्रयत्न करून पाऊस पडू असा विश्वास आयएसपीएस संस्थचे प्रमुख अब्दुल रहेमान यांनी व्यक्त केला आहे.

सायगाव इथून ढगांवर एकूण 7 रॉकेट्सचा मारा करण्यात आला. यापैकी चार रॉकेट्स खाली कोसळले तर तीन रॉकेट्स ढगांपर्यंत पोहचले, पण पाऊस काही पडला नाही. त्यानंतर हा प्रयोग तूर्तास थांबवण्यात आला आहे.

दरम्यान, कालही कृत्रिम पावसासाठी प्रयत्न करण्यात आला होता.पण मेघराजांनी पाठ फिरविल्याने काल (रविवारी) हा प्रयोग होऊ शकला नाही. तर औरंगाबादमध्येही कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग होण्याची शक्यता आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2015 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close