S M L

परभणीवर दुष्काळाचे ढग, जनावरांना घेऊन शेतकर्‍यांचं गावाबाहेर बस्तान !

Sachin Salve | Updated On: Aug 3, 2015 04:54 PM IST

परभणीवर दुष्काळाचे ढग, जनावरांना घेऊन शेतकर्‍यांचं गावाबाहेर बस्तान !

पंकज क्षीरसागर, परभणी

03 ऑगस्ट : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी परभणी जिल्हा अजूनही कोरडाच आहे. जिल्ह्यातल्या 65 टक्के पेरण्या वाया गेल्या आहेत. दुबार पेरणीसाठी शेतकर्‍यांकडे पैसे तर नाहीतच, शिवाय जवळ असलेल्या पशुधनाचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे पडलाय. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट...

 परभणीची दृश्य पाहून कुणालाही वाटेल की, आपण एखाद्या अभयारण्यात आलो आहोत की काय...हे चित्र आहे पावसाअभावी कोरड्या पडलेल्या परभणील्या येलदरी धरणाच्या पात्राचं...या पात्रात सध्या जिकडे पाहावं तिकडे जनावरंच जनावरं दिसत आहेत.

जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात जनावरासाठी चाराच उरला नसल्यानं शेतकरी आपली जनावरं या पात्रात चरण्यासाठी सोडून देत आहेत. तालुक्यातले 25 ते 30 गावातले शेतकरी आपल्या हजारो जनावरांसह गेल्या 5 दिवसांपासून आपलं घरदार शेती सोडून आपल्या कुटुंबियांसह इथं राहत आहेत. पण, आता इथला चाराही संपत आल्यानं काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

तब्बल 2200 एकर असलेला हा येलदरी प्रकल्प कोरडा पडण्याच्या वाटेवर आहे. गेल्या 52 वर्षांत अशा भीषण दुष्काळाचा सामना करण्याची ही वेळ परभणी जिल्ह्यावर आली आहे. आपल्या जनावरांचा जीव वाचावा म्हणून ही सगळी कुटुंबं बैलगाड्या, राहुट्या टाकून राहत आहेत. सकाळ-संध्याकाळचा जेवणाचा डबा गावाकडून मागवून ते इथंच जेवण करताहेत. दिवसेंदिवस इथं शेतकर्‍यांचे लोंढे वाढत आहेत. मात्र प्रशासनानं याची दखलही घेतली नाही. मराठवाड्यातल्या या शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे शासन गांभीर्यानं पाहणार का हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2015 04:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close