S M L

‘दिल’दार मुंबईकर थांबले आणि ‘त्या’ला जीवनदान मिळाले !

Sachin Salve | Updated On: Aug 3, 2015 09:52 PM IST

 ‘दिल’दार मुंबईकर थांबले आणि ‘त्या’ला जीवनदान मिळाले !

mumbai hart news03 ऑगस्ट : मुंबई अहोरात्र धावणारी मुंबापुरी....पण सतत धावणारी मुंबई काही वेळ थांबली होती. कारण होतं एका रुग्णाला जीवनदान देण्यासाठी गरजेचा असलेला एक प्रवास...मुंबईकरांच्या दिलदारपणामुळे एका तरुणाला जीवनदान मिळालंय.

मुंबईतल्या मुलुंड इथल्या फोर्टिस या खासगी हॉस्पिटलमध्ये 22 वर्षीय अनवर खान यांच्यावर ह्रदय रोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. पुण्याच्या जहागीर हॉस्पिटलमधून एका 42 वर्षीय रुग्णाचं ह्रदय काढण्यात आलं होतं. ती शस्त्रक्रिया आजच करण्यात आली होती. ते ह्रदय घेऊन फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं एक पथक विशेष विमानाने पुण्याहून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निघालं होतं. एका तासांत हे विमान मुंबई विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या साह्याने मुंबईतील ठिकठिकाणाची वाहतूक थांबवून विमानतळ ते मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटल 20 किलोमीटरचं अंतर 18 मिनिटांत पार करून हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यात आलं.

यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष व्यवस्था केली होती. वाहतूक विभागाचे 150 अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. तसंच या ऍम्बुलन्सच्या समोर 2 मोटरसायकस्वार त्याचबरोबर वाहतूक पोलिसांची गाडी तैनात होती. त्याशिवाय वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय दालत्कर तसंच एक डॉक्टरांच्या पथकाची गाडी सोबत होती.

5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अनवरवर यशस्वी ह्रदय रोपण करण्यात आलं. अनवरला हृदयाचा त्रास होता आणि तो गेल्या आठवठ्याभरापासून फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता असं येथील डॉक्टर नारायणी यानी संगितलं. हे ह्रदय काढल्यानंतर जास्ती जास्त 4 तासांत हे ह्रदय रोपण करावं लागत. पण फोर्टिस हॉस्पिटलने हे ह्रदय फक्त दोन तासांत आणून त्याची प्रक्रिया पूर्ण केली. या अगोदरही बंगळुरमध्ये अशीच एक घटना घडली होती आणि बंगळुरनगरी एका जीवासाठी थांबली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2015 09:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close