S M L

महिला,बालकल्याण खात्याची बिस्किटंही निकृष्ट- एफडीए

Samruddha Bhambure | Updated On: Aug 4, 2015 10:00 PM IST

महिला,बालकल्याण खात्याची बिस्किटंही निकृष्ट- एफडीए

04 ऑगस्ट : निकृष्ट दर्जाची चिक्की पुरवठा केल्यामुळे महिला आणि बालकल्याण विभागावर टीकेची झोड उठली असतानाच आता या विभागाकडून पुरवली जाणारी बिस्किटंही आरोग्याला अपायकारक असल्याचं उघड झालं आहे. महिला आणि बालकल्याण विभागाकडून जी बिस्किटं लहान मुलं आणि महिलांना पुरवली गेली त्यात आम्लाचं म्हणजेच ऍसिडचं प्रमाण जास्त असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटलं आहे. एफडीएचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने घेतलेल्या चाचणीत बिस्किटांमध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा चौपट प्रमाणात ऍसिड आढळलं आहे.

पुण्यातील गोवर्धन आयुर्फामा कंपनीकडून 5 कोटी रुपयांची आयुर्वेदिक बिस्किटांची खरेदी केली गेली होती. ही बिस्किटं पौष्टिक असल्याचं सांगत ज्या लहान मुलांना आणि स्त्रियांना अशा अधिक पौष्टीक आहाराची गरज असते त्यांच्यासाठी महिला आणि बालकल्याण विभाग ही बिस्किटं पुरवतं. 6 महिने ते 3 वर्षांपर्यंतची अंगणवाडीतली मुलं, किरशोरवयीन मुली आणि गरोदर आणि स्तनदा माता यांना ही बिस्किटं पुरवली जातात. पण, या बिस्किटांमध्ये गोवर्धन आयुर्फामा कंपनीच्या या बिस्किटांमध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा चारपट आम्ल सापडलं आहे. त्यामुळे ती खाण्यास योग्य नाही, असं एफडीएच्या अहवालात म्हटलेलं आहे. त्यामुळे महिला आणि बालकल्याण विभाग गरोदर महिलांच्या आरोग्याशी खेळत आहे का, असा सवाल विचारला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2015 10:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close