S M L

रमेश कदमांनी 385 कोटी रुपयांपैकी 175 कोटी लाटले ?

Sachin Salve | Updated On: Aug 6, 2015 06:32 PM IST

ramesh_kadam_ncp06 ऑगस्ट : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील 385 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार रमेश कदम तब्बल 18 दिवसांपासून फरार आहेत. 385 कोटी रुपयांपैकी तब्बल 147 कोटी रुपयांची रक्कम कदम यांनी स्वत: गिळंकृत केल्याची बाब समोर आलीय.

385 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात 147 कोटी रुपये कदमने निव्वळ स्वत:च्या फायद्यासाठी घेतल्याचे सीआयडीच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आलंय. यामध्ये बोरिवलीत मुख्यालय असलेल्या जोशाबा मध्यवर्ती ग्राहक संस्थेला 41 कोटी रुपये महामंडळाकडून दिले. त्यातून 2 कोटी रुपयांचा एक फ्लॅट कदम यांनी आपल्या पत्नी प्रतिभाच्या नावावर खरेदी केलाय. तसंच औरंगाबाद येथील नियोजित अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीला महामंडळाच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असलेल्या खात्यातून 58 कोटी 65 लाख 30 हजार रुपये वळविण्यात आले. त्यावर 1 कोटी 12 लाख 80 हजार रुपये व्याज मिळाल्याने एकूण रक्कम 59 कोटी 78 लाख 10 हजार रुपये झाले. या सूतगिरणीचा अध्यक्ष स्वत: रमेश कदमच आहे.

दरम्यान कदम यांच्या शिवाय महामंडळाचे दोन माजी महाव्यवस्थापकही पसार झाले असून, सीआयडीला अद्याप कोणालाही पकडता आलेले नाहीय. महामंडळाच्या घोटाळ्यांमध्ये सामील असलेले माजी महाव्यवस्थापक संतोष इंगळे आणि निलंबित महाव्यवस्थापक एस.के. बावणे हेही अद्याप सीआयडीच्या हातावर तुरी देऊन फिरत आहेत. अण्णाभाऊ साठेंचं नाव कलंकित करणार्‍या या आमदाराला पोलीस का पकडत नाहीयेत. असा प्रश्न जनसामान्य विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2015 06:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close