S M L

सेनेची वचनपूर्ती, 15 कोटी खर्चून खरेदी केले जाणार 22 हजार 800 टॅब !

Sachin Salve | Updated On: Aug 6, 2015 10:34 PM IST

सेनेची वचनपूर्ती, 15 कोटी खर्चून खरेदी केले जाणार 22 हजार 800 टॅब !

06 ऑगस्ट : शिवसेनेनं विद्यार्थ्यांच्या पाठीवरच ओझ हलक करण्यासाठी टॅब देण्याचा आधुनिक उपक्रम हाती घेतलाय आणि आता त्याची वचनपूर्ती करत 'करून दाखवलं' असं सिद्ध केलं. आज मुंबई पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 22 हजार 800 टॅब खरेदीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील देण्यात आलाय. तब्बल 15 कोटी रुपये खर्चून टॅब खरेदी केले जाणार आहे.

शिवसेनेनं मुंबई पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी टॅबवर अभ्यासक्रमाची योजना आखली. अलीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काही टॅब लाँच करण्यात आणि विद्यार्थ्यांना टॅब वाटपही करण्यात आले.  मुंबईत महानगरपालिका आता पालिकेच्या शाळेत शिकणार्‍या आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅबचं वाटप करणार आहे. त्यासाठी तब्बल 22 हजार आठशे टॅब खरेदीचा प्रस्ताव आज पालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला. विरोधकांनी टॅबबाबत अनेक शंका उपस्थित केल्या असल्या तरी सत्ताधारी सेना भाजपनं मात्र बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव संमत करुन घेतलाय.

दुसरीकडे एरवी छोट्या छोट्या गोष्टीवरुन नाराज होत बहिष्कार घालणारे विरोधक ही नावाला पुरते विरोध करत आहेत की काय अशी शंका येत होती. हे टॅब खरेदी करण्यासाठी सुरुवातीला 15 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सुरुवातीला आठवीच्या वर्गात शिकणार्‍या मुलांना हे वाटप केलं जाणार आहे. त्यानंतर टप्या टप्यानं 9वी आणि 10वीच्या मुलांना ही हे टॅब दिले जाणार आहे.

टॅबबाबतीत काही प्रश्न...

- शाळा सुरू होऊन दोन महिने झाले आहेत.

- यावर्षी ज्या आठवीच्या मुलांना पुस्तक वाटप करण्यात आले आहेत ते पैसे वाया जाणार नाही का ?

- हा प्रस्ताव पुढल्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आणता आला नसता का ?

- शिवसेना लोकांच्या पैशांनी आपला राजकीय अजेंडा राबवतेय का ?

- बाजारातल्या इतर टॅबच्या तुलनेत या टॅबची किंमत जास्त नाही का ?

-हा टॅब विद्यार्थ्यांना घरी घेवून जाता येवू शकेल मग त्याची हमी कोण घेणार?

- टॅब चोरीला गेला तर काय ?

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2015 08:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close