S M L

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, मेट्रोचा प्रवास महागणार

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2015 05:26 PM IST

mumbia-metro111107 ऑगस्ट : मुंबईकरांना गारेगार प्रवासाचा दिलासा देण्यार्‍या मेट्रोचा प्रवास आता चांगलाच महागाईचे चटके देणारा ठरणार आहे. मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे मेट्रोच्या तिकीटांत 50 ते 110 रुपये दरवाढ होण्याची शक्यता आहे. ही दरवाढ 3 महिन्यानंतर लागू होईल अशी माहिती मिळत आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने रिलायन्स मेट्रोला डिपॉझिटही परत करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

मुंबईकरांच्या दिमतीला मेट्रो दाखल झाली खरी पण सुरुवातील अल्प दरात मुंबईकरांना मेट्रोची सफर मिळाली. मात्र, तिकिटांच्या दरात वाढ करावी असा प्रस्ताव रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने मांडला होता. पण राज्य सरकार दरवाढीला नकार दिला होता. या दरवाढीविरोधात राज्य सरकारने हायकोर्टात धाव घेतली होती. रिलायन्सने सुरुवातीला 10 ते 40 रुपये दरवाढ करण्याची मागणी केली होती. हायकोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावत मंजुरी दिली होती. आता या निर्णयावर सुप्रीम कोर्टानेही मोहर उमटवली असून मेट्रोचा प्रवास आता चांगलाच महागणार असून मेट्रोचे दर 110 रुपयांत वाढण्याची मुभा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला मिळालीये. त्यामुळे घाटकोपर ते वर्सोव्हा प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2015 05:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close