S M L

बुलडाण्यात सप्तश्रृंगी मंदिरात चोरी

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2015 07:10 PM IST

बुलडाण्यात सप्तश्रृंगी मंदिरात चोरी

07 ऑगस्ट : बुलडाणा येथील शेगावच्या सप्तश्रृंगी मंदिरात चोरी झाल्यामुळे खळबळ उडालीये. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून चोराने देवीच्या मंदिरातील गाभार्‍याचे कुलूप तोडून चांदीचे छत्र आणि सोन्याच्या पोथा असे हजारो रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे.

मंदिरातील मूर्तीवर असलेले लहान मोठे 3 चांदीचे छत्र आणि 2 सोन्याचे मंगळसूत्र चोरण्यात या चोरट्याला यश आले आहे. संबंधित प्रकारबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. तपासात पोलिसांना दानपेटी आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य आणि सीसीटीव्ही कॅमेरे एका शेतात आढळून आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2015 07:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close