S M L

अमरावतीत मुसळधार पावसामुळे शेती गेली 'पाण्यात'

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2015 02:01 PM IST

vidarbha rain3408 ऑगस्ट : अमरावती जिल्ह्यात सतत 3 दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं तसंच घराचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय. नदीकाठावरील शेती पूर्णता खरडून गेल्याने शेतकरी हवालदील झालाय. तिवसा आणि अमरावती तालुक्यात सर्वात जास्त नुकसान आहे. या पावसामुळे 4 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झालंय.  तर पावणे 3 हजार घराची पडझड झालीये.

मेळघाट मधील अनेक रस्ते वाहून गेलेत. तर काही ठिकाणी दरड कोसळल्यात. अमरावती जिल्ह्यातील कुंण्ड सर्जापूर इथं पेढी नदीवरील पूल वाहून गेल्याने 5 ते 6 गावांचा संपर्क तुटलाय. तर 2 रुग्णांना या वाहून गेलेल्या पुलावरून अमरावतीला रुग्णालयात न आणता आल्याने आपले प्राण गमवावे लागले. गावातील रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना अमरावतीला येणे अशक्य झालंय. वाहून गेलेला पूल ओलांडताना अनेकांचे अपघातही झालेत.

वर्ध्यात पिकांचं नुकसान

तर, वर्धा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातल्या सर्व आठ तालुक्यांमधल्या शेतीला बसला आहे. पाऊस आणि पुराच्या मार्‍यामुळे कापूस, सोयाबीन ही पिकं नष्ट व्हायला लागली आहेत. वादळी पावसासोबतच पुराच्या पाण्याचा फटका शेतातल्या उभ्या पिकाला बसतोय. यशोदा, भदाडी या नद्यांना पूर आलाय. नदी काठावरच्या जवळपास 5 हजार हेक्टरवरची पिकं धोक्यात आली आहेत. सरूळ, भदाडी, बोरगाव, कापशी शिवारातील शेती खरडून गेली आहेत. तसंच शेतामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं पिकं सडण्याची भीती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2015 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close