S M L

राधे माँला सोमवारपर्यंत मुंबईत हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2015 05:47 PM IST

राधे माँला सोमवारपर्यंत मुंबईत हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश

08 ऑगस्ट : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँ सध्या नांदेडच्या एका हॉटेलमध्ये तळ ठोकून आहे. नांदेड पोलिसांनी राधे माँची चौकशी केली. राधे माँवर दोन एफआयआर दाखल आहेत. सोमवारी राधे माँला मुंबईत हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत.

आज सकाळी राधे माँनं नांदेडमध्ये गुरुद्वारामध्ये माथा टेकला. तिथे तिनं 51 हजारांची देणगी दिली. राधे माँचं तिच्या भक्तांनी जल्लोषात स्वागत केलं. शुक्रवारी औरंगाबादमध्येही राधे माँची औरंगाबाद क्राईम ब्रांचनं चौकशी केली. मला परमेश्वरच न्याय देईल, अशी प्रतिक्रिया राधे माँनी दिलीये. राधे माँवर निक्की गुप्ता या महिलेनं हुड्यांसाठी छळ आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय.

आलीशान गाडी आणि पैशांची उधळण

आपल्या पेहरावानं, विचित्र वागण्यानं राधे माँ सतत चर्चेत असते. राधे माँच्या पेहरवाबद्दल, तिच्या चप्पलांबद्दल, गाडीबद्दल सतत चर्चा होते. राधे माँच्या कपड्यांची किंमत लाखांमध्ये असल्याची माहिती आहे. आणि तिचे शूजही त्याला साजेसेच असतात. भक्तांची कैवारी असलेली राधे माँ आलीशान गाडीतून फिरते. तिचे भक्त तिची इतकी काळजी घेतात की तिच्या पायांना जमिनीचा स्पर्श होऊ नये यासाठी राधे माँला गाडीतून उतरल्यावर उचलून घेतलं जातं. कोट्यवधीची संपत्ती असलेली राधे माँ सतत अशा मेकअपमध्ये असते. तिच्या हातात कायम एक सोन्याचा त्रिशूळ असतो. नांदेडमध्ये गुरुद्वाराच्या रक्षकालाही राधे माँनं हे पैसे वाटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2015 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close