S M L

मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणार्‍या पोलिसाची नागरिकांनी केली धुलाई

Sachin Salve | Updated On: Aug 8, 2015 02:27 PM IST

मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणार्‍या पोलिसाची नागरिकांनी केली धुलाई

08 ऑगस्ट : मुंबई येथील डोंगरी पोलीस ठाण्यात सेवेत असणार्‍या देवीदास रामचंद्र चौधरी ह्या पोलिसाने कल्याण कोलसवाड़ी मधील तिसगाव बाजारपेठेत दारुच्या नशेत धिंगाणा घातला आणि महिलांशी अश्लील चाळे केले हे पाहून संतापलेल्या नागरिकांनी पोलिसांला चांगलाच चोप दिला. आणि कोलसवाडी पोलिसांच्या हवाली केले.

देवीदास चौधरी हा दारुच्या नशेत महिलांशी अश्लील चाळे करू लागला असता महिलांनी तो दारुड्या आहे असे समजून दुर्लक्ष केले आणि त्याला मज्जाव केला मात्र नशेत असलेल्या या पोलिसाने महिलानाचे दगडं मारण्यास सुरुवात केली. हा सगळा प्रकार बघुन नागरिक संतापले आणि सर्व नागरिकांनी मिळून पोलिसाला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. प्धिंगाणा करणार्‍या पोलिसावर महिलांच्या तक्रारीवरुन विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

p>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2015 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close