S M L

दहशतवादी हल्ल्यात आणखी एक जवान शहीद

Samruddha Bhambure | Updated On: Aug 9, 2015 05:15 PM IST

ceasefire

09 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरुच असून कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरुच आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला असून, दोन जवान जखमी आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. रविवारी कुपवाडा जिल्ह्यातील तंगधर सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत एक जवान हुतात्मा झाला तर निमलष्करी दलाचे दोन जवान जखमी झाल्याची माहिती लष्कर अधिकार्‍यांनी दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालत असताना काही दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

दरम्यान, रागणी चौकीजवळ शनिवारी संध्याकाळी या चकमकीला सुरुवात झाली. दहशतवाद्यांबरोबर अद्याप चकमक सुरू असून, अधिक सुरक्षा रक्षक घटनास्थळी पाठवण्यात आलं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2015 12:45 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close