S M L

ऑगस्ट क्रांतिदिन : विरोधकांच्या टीकेनंतर सत्ताधार्‍यांना आली जाग

Samruddha Bhambure | Updated On: Aug 9, 2015 05:02 PM IST

ऑगस्ट क्रांतिदिन : विरोधकांच्या टीकेनंतर सत्ताधार्‍यांना आली जाग

Vinod tawade @ august maidanr

09 ऑगस्ट : ऑगस्ट क्रांतिदिनी संपूर्ण देशात स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचं स्मरण केलं जातं. मात्र मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानावरील कार्यक्रमाला एकही सत्ताधारी नेता फिरकला नसल्याने विरोधकांसह सर्वच स्तरातून टीकेचा वर्षाव झाला. प्रसार माध्यमांतूनही बातम्या आल्या. त्यानंतर अखेर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानात जाऊन आदरांजली वाहिली.

ऑगस्ट क्रांती मैदानात आज सकाळपासून हुतात्म्यांना अभिवाद करण्यात येत आहे. शहरातील विविध शाळा, संस्था, संघटनांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. मात्र, सत्ताधारी भाजपा-शिवसेनेचा एकही नेता अथवा पदाधिकारी तिकडे फिरकला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याने या कार्यक्रमाला हजेरी लावलेली नव्हती. त्यामुळे सत्ताधार्‍यांना स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांचा विसर पडला काय?, असा संतप्त सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. तसंच भाजप ही वैचारिक विचारधारा बदलण्याचं काम करत असल्याचा आरोपही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला. याविरोधात आवाज उठवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

विरोधकांकडून झालेल्या या टीकेनंतर मात्र सरकारला जाग आली आणि सांस्कृतिक कार्यमंत्र्यानी ऑगस्ट क्रांती मैदानात जाऊन स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या क्रांतिकारकांना आदरांजली वाहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2015 01:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close