S M L

दारूड्या मुलाकडून जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Samruddha Bhambure | Updated On: Aug 10, 2015 11:15 AM IST

CrimeScene2

10 ऑगस्ट : जेवण दिले नाही म्हणून एका दारूडय़ा मुलाने जन्मदात्या आईवर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली गावात उघडकीस आली. गंभीर जखमी झालेल्या आईला उपचारासाठी नगरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रमिला हारदे असं या पीडित महिलेचं नाव आहे. याप्रकरणी तिचा दारूडा मुलगा सुभाष हारदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाषला दारूचे व्यसन आहे. दारूच्या नशेत असताना त्याने प्रमिला यांच्याकडे जेवण मागितले. मात्र, जेवण देत असतानाच सुभाषने त्यांच्यावर रॉकेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या प्रमिला यांना उपचारासाठी नगरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2015 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close