S M L

प्रवेशासाठी पैसे मागणारा लाचखोर मुख्याध्यापक कॅमेर्‍यात कैद

Sachin Salve | Updated On: Aug 10, 2015 03:38 PM IST

प्रवेशासाठी पैसे मागणारा लाचखोर मुख्याध्यापक कॅमेर्‍यात कैद

10 ऑगस्ट : कल्याण तालुक्यातल्या मोहने गावातल्या पहिल्या वर्गात प्रवेशासाठी भटक्या विमुक्त जातीतल्या मुलांच्या पालकांकडून लाच मागण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. या आश्रमशाळेचे मुख्याध्यापकच पैशांची मागणी करतायत. लाच मागताना शाळेचे मुख्याध्यापक स्वत: कॅमेर्‍यात कैद झालेत. हे स्टींग ऑपरेशन, याच भागात भटक्या विमुक्त जमातींसाठी काम करणार्‍या एकता निराधार मंचाच्या कार्यकर्त्यांनी केलंय.

पहिल्या वर्गात प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापकांनी एका पालकाकडे हजार रुपये मागत असल्याचं कॅमेर्‍यात कैद झालंय. इतके पैसे जवळ नाही असं पालकांनी म्हटल्यावर मी तर या शाळेत मुलांना प्रवेश देतच नाही. पण तुम्हाला म्हणून देत होतो, पैसे द्या अशी मागणी करताना हे मुख्याध्यापक महाशय दिसतायत. महिलेने पुन्हा इतके पैसे नाही 200 रुपयेच आहेत, असं सांगितल्यावरही हे 200 रूपये घेत मुख्याध्यापकांनी ते टेबलाच्या खणात टाकले. आदिवासी आणि भटक्या विमुक्त जमातींच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं, यासाठी असलेल्या या आश्रमशाळा अशा लोभी व्यक्तींसाठी पैसे कमवण्याचं साधन बनल्यात. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक दृष्टा आधीच दुर्बल घटकांची आणखी पिळवणूक होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2015 03:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close