S M L

केजरीवालांची साथ सोडा अन्यथा तुमचा दाभोलकर-पानसरे होईल, अण्णांना पुन्हा धमकी

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2015 03:04 PM IST

annaday11 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वारंवार धमकीचे पत्र येत असल्याच्या घटना घडत आहेत. आता पुन्हा एकदा अण्णांना धमकीचं पत्र आलंय. या पत्रात अरविंद केजरीवालांची साथ सोडा, अन्यथा तुमचा दाभोळकर, गोविंद पानसरे होण्याची वेळ येईल अशी धमकी त्यांना देण्यात आलीय.

आता बस्स झाले, आता जास्त नाटक करू नका, केजरीवालसारखा सैतान तुम्ही तयार केलाय. त्यामुळे तुम्ही राळेगणमध्ये शांत बसा अन्यथा तुमचा नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे होण्याची वेळ येईल" अशी धमकी या पत्रातून देण्यात आली. तर हिंदीमध्ये केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यामध्ये वादात तुम्हीच जबाबदार असाल, असंही बजावलंय. हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे पत्र आहे. या पत्रामध्ये कुठलाही शिक्का नाही. दरम्यान, अशा धमक्या मला आधीही आल्या आहेत. त्यामुळे मी त्याला घाबरत नाही तसेच केजरीवाल राजकारणात गेल्यापासून त्यांचा आणि माझा संबंध नाही असं स्पष्टीकरण अण्णा हजारे यांनी केले आहे.

या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अण्णा हजारेंना धमकीचं पत्र आल्यानं पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतलाय. अण्णांच्या सुरक्षेत कोणत्याही त्रुटी राहणार नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी दिलीय. त्याचबरोबर अण्णांच्या सुरक्षेचा अहवाल सरकारला पाठवण्यात आलाय. गरज पडल्यास अजून सुरक्षा वाढवण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय. अण्णा हजारेंनी सध्या वन रँक वन पेंशन आणि भूमी अधिगृहण कायद्यावरुन आंदोलन सुरू केलंय. त्यातच हे धमकीचं पत्र आल्यानं खळबळ उडालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2015 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close