S M L

दुष्काळ निवारणासाठी प्रसंगी टॅक्स लावणार?

Samruddha Bhambure | Updated On: Aug 11, 2015 09:16 PM IST

Drought

11 ऑगस्ट : दुष्काळ निवारण निधी उभारण्यासाठी राज्य सरकार प्रसंगी अतिरिक्त टॅक्स लावणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना करताना अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी हा मानस बोलून दाखवला. या कराचा सर्व पैसा दुष्काळी भागातल्या उपाययोजनांसाठी खर्च केला जाणार आहे. याशिवाय आणखीही काही निर्णय घेण्यात आले.

टंचाईग्रस्त भागात धरणातलं पाणी आरक्षित केलं जाणार आहे. गरज असल्यास टंचाईग्रस्त भागात रेल्वेनं पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, आवश्यकता पडल्यास या निर्णयामध्ये बदल केला जाईल. वन विभागाच्या अंतर्गत चराऊ कुरणांसाठी जमीन राखून ठेवली जाईल. तसंच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे.

दरम्यान, मराठवाड्यात केंद्रीय पथकानं आजपासून दुष्काळी भागाचा पाहणी दौरा सुरू केला. पण रहाटगावात शेतकर्‍यांनी केंद्रीय पाहणी पथकाचा ताफा काही काळासाठी अडवून धरला होता. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी मागणी यावेळी आंदोलक शेतकर्‍यांनी केली. पैठण तालुक्यातल्या ढोरकीन आणि कारकीन गावातल्या शिवारातल्या दुष्काळस्थितीही केंद्रीय पथकाने पाहणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2015 09:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close