S M L

हाफिज सईद अमेरिकेच्या रडारवर !

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2015 12:34 PM IST

hafiz saied12 ऑगस्ट : मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याची पुनरावृत्ती जगाला परवडणारी नाही अशी स्पष्ट भूमिका घेत आता लष्कर -ए-तोयबाचा संस्थापक आणि मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद आता अमेरिकेच्या रडारवर आलाय. सईद आणि त्याच्या जवळच्या सहकार्‍यांविरूद्ध अमेरिका कारवाई करणार आहे.

सईद आणि त्यांच्या सहकार्‍यांना मिळणारी सर्व आर्थिक मदत बंद करून त्यांचं नाक दाबण्याचा प्रयत्न अमेरिका करणार आहे अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिलीय. हाफिज सईद आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या हालचालीवर अमेरिकेची करडी नजर आहे. सईदचा नातेवाईक अब्दुल रहमान मक्की याला अमेरिकेनं मुख्य लक्ष्य केलंय. कारण, मक्की हा सईदचा मुख्य फाईनान्सर आहे. मक्कीवर 2 बिलियन डॉलरचं बक्षीस आहे. एवढंच नाहीतर सईदची आर्थिक रसद तोडण्यासाठी अमेरिका चीनचीही मदत घेणार असल्याचं कळतंय

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2015 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close