S M L

चांदिवलीत अनधिकृत ठपका ठेवून शाळेवर हातोडा

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2015 02:51 PM IST

चांदिवलीत अनधिकृत ठपका ठेवून शाळेवर हातोडा

12 ऑगस्ट : मुंबईतील चांदिवली परिसरातल्या 2 शाळांवर अनधिकृत असल्याचं कारण सांगून हातोडा चालवण्यात आला. चांदिवलीतल्या सेंट ज़ॉन पॉल आणि कुशाभाऊ बांगर या 2 शाळा अनधिकृत असल्याचं कारण सांगून त्या पाडण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांचं पथक पोहोचलं. त्यातली सेंट ज़ॉन पॉल ही शाळा पाडण्यात आली. पण कुशाभाऊ बांगर शाळेतले विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरल्यामुळे हे पथक परत पाठवण्यात आलं.

चांदिवलीतल्या संघर्षनगर इथली सेंट जॉन पॉल ही 2008 सालापासून सुरू होती. या शाळेत गरीब आणि मोलमजुरी करणारे मुलं शिक्षण घेत होते. जिल्हाधिकार्‍यांनी पूर्ण चौकशी न करता बिल्डरच्या दबावाखाली शाळा पाडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप शाळेच्या अध्यक्षांनी केलाय. याच संघर्ष नगरमध्ये कुशाभाऊ बांगर ही दुसरी मराठी शाळा आहे. 2000 सालापासून सुरू असलेल्या या शाळेवरही कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पण विद्यार्थी आणि पालकांच्या विरोधामुळे हे पथक परत पाठवण्यात आलं. आता या दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2015 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close