S M L

नागपुरात पावसाचा कहर, कोराडीचा कालवा फुटला

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2015 02:54 PM IST

नागपुरात पावसाचा कहर, कोराडीचा कालवा फुटला

13 ऑगस्ट : नागपुरात पावसानं कहर केलाय. पहाटेपासूनच नागपुरात मुसळधार पाऊस कोसळतोय. शहरातील अंबाझरी, फुटाला, गोरेवाड़ा इथं तलाव पाण्यानं भरून वाहतायत. अनेक वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. या पावसामुळं नागपूरजवळच्या कोराडीमध्ये कालवा फुटलाय. कालवा फुटल्यामुळे इंदोरा-बेसा हा परिसर जलमय झालाय. जोरदार पावसामुळे नागनदी दुथडी भरून वाहतेय. तेलंगखेडी तलावही भरून वाहतोय. तर समतानगर इथल्या पंचशील चौकातही पाणी तुंबलंय.

शाळेत पाणीच पाणी

तर भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरण, वर्धा जिल्ह्यातील अप्पर वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील सिंभोरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. भवन शाळा सिविल लाईन, मॉडर्न स्कूल कोराडी रोड, पूर्व नागपूरातील संजय नगर शाळा तसंच इंदोरा मनपाच्या शाळेत पाणी शिरलंय. त्यामुळं शाळांना सुट्टी देण्यात आलीये.

आर्वीत अतिवृष्टी

मागील चोविस तासात झालेल्या पावसाने आर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आलीये. तर या तालुक्यांपाठोपाठ देवळी आणि कारंजा तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या 24 तासांपासून बरसणार्‍या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडूंब भरून वाहतायत. लोअर वर्धा प्रकल्पाचे 31 दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मोठे आणि मध्यम जलाशयामध्ये एकूण 1574.48 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे. तर अप्पर वर्धा जलाशयामध्ये सर्वाधिक 564.05 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण 256.30 मि.मी पावसाची नोंद झालीये. तर सरासरी 32.04 मि.मी एवढा पाऊस झालेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2015 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close