S M L

काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

18 डिसेंबर शुक्रवारी ठाणे शहर महिला अध्यक्षपदाच्या पदग्रहण सोहळयात महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे काँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा तीव्र झाल्याचं दिसून आलंय. ठाणे शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी मालती भोईर या कार्यरत होत्या. मालती भोईर या पदावर कार्यरत असताना अचानक काँग्रेस कार्यकर्त्या रेखा मिरजकर यांना अध्यक्षपदाची धुरा महाराष्ट्र कमिटीकडून दिल्याचं सांगण्यात आलं. याच वेळी सोहळ्यात मालती भोईर आणि रेखा मिरजकर यांच्यात जोरदार हाणामारी झाली. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी समज दिल्याचं समजतं. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2009 12:42 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2009 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close