S M L

लंकेचा दणका, भारताचा दारुण पराभव

Sachin Salve | Updated On: Aug 15, 2015 07:06 PM IST

लंकेचा दणका, भारताचा दारुण पराभव

15 ऑगस्ट : आज स्वातंत्र्य दिनी भारतीय क्रिकेट टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं. गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर श्रीलंकेनं भारताचा दारूण पराभव केला. 176 रन्सचा पाठलाग करणारी टीम इंडिया 63 रन्सने पराभूत झाली. भारताची दुसरी इनिंग फक्त 112 रन्सवर गारद झाली. भारतातर्फे सर्वाधिक अजिंक्य रहाणेंनं 36 रन्स केले. तर शिखर धवनने 27 रन्स केले. लंकनं टीमचा स्पिनर हेराथने 7 विकेट घेऊन टीम इंडियाला पराभवाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. तर टी कौशलने 3 विकेट घेतल्या.

आज सकाळी चौथ्या दिवसाची सुरुवात खराब झाली. टीम इंडिया पहिला झटका ईशांत शर्माचा बसला. ईशांत 10 रन्स करून आऊट झाला. 14 ओव्हरमध्ये 2 विकेटवर 30 रन्स अशी अवस्था टीम इंडियाची होती. त्यानंतर आलेला रोहित शर्मा अवघे 4 रन्स करून आऊट झाला. रोहित नंतर कमान सांभाळण्यासाठी कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. पण विराटही 3 रन्स करून पव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर एकापाठोपाठ विकेट पडण्याचा सत्र सुरू झालं. शिखर धवनने 28 रन्सवर आऊट होऊन पाचवा झटका दिला.

33 व्या ओव्हरमध्ये टीम इंडिया 7 विकेटवर फक्त 67 रन्स अशी अवस्था झाली. अजिंक्य रहाणेंनं एकाकी लढत दिली. पण त्याचे ही प्रयत्न अपुरे पडले. रहाणे 36 रन्सवर आऊट झाला. या अगोदर टीम इंडियाने दुसर्‍या इनिंगमध्ये 367 रन्स केले होते. लंकनं टीमने पहिल्या इनिंगमध्ये 183 रन्स केले होते. तर भारताने 375 रन्स केले होते. तर लंकनं टीमला 175 धावांची आघाडी मिळाली होती. लंकनं टीमकडून दिनेश चांडीमलने नाबाद 162 धावा ठोकल्यात. चांडीमलच्या धडाकेबाज खेळीमुळे विजयाचा पाय भरला गेला. भारताकडून आर.आश्विनने चार विकेट घेतल्या तर अमित मिश्राने 3 विकेट घेतल्यात. आश्विनने दमदार कामगिरी करत या कसोटीत 10 विकेट घेतल्यात. तर अजिंक्य रहाणेंने आठ कॅच घेत एकाच सामन्यात सर्वाधिक कॅच घेण्याचा रेकॉर्ड केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2015 07:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close