S M L

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप: सायनाची 'सुवर्ण'संधी हुकली

Samruddha Bhambure | Updated On: Aug 16, 2015 08:09 PM IST

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप: सायनाची 'सुवर्ण'संधी हुकली

saina-nehwal-carolina-marin-1116 ऑगस्ट : जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरण्याचे 'फुलराणी' सायना नेहवालची संधी हुकली आहे. जेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून सायनाला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळं सायनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. पण सायनाची ही कामगिरीही ऐतिहासिक ठरली आहे. कारण जागतिक विजेतेपद स्पर्धेत फायनल गाठणारी आणि रौप्यपदक मिळवणारी सायना पहिलीच भारतीय ठरली आहे.

कॅरोलिनानं पहिला सेट 16-21 तर नंतरच्या सेटमध्ये 19-21 अशा फरकानं खिशात घातला. यापूर्वी, ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम लढतीतही कॅरोलिनानं सायनाचा पराभव केला होता. आणि आता जागतिक विजेतेपद स्पर्धेतही कॅरोलिनाकडून पराभव झाल्यानं, सायनाला रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2015 07:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close