S M L

ड्रायव्हर विरहित कारने मोदींची मस्दर सिटीला भेट

Sachin Salve | Updated On: Aug 17, 2015 05:18 PM IST

ड्रायव्हर विरहित कारने मोदींची मस्दर सिटीला भेट

modi in masdar317 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएई दौर्‍याचा आज दुसरा दिवस आहे. आज (सोमवारी) त्यांचा पहिला कार्यक्रम आहे तो हायटेक मस्दर सिटीला भेट... या हायटेक सिटीमध्ये त्यांनी उद्योजकांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी इथल्या वेगवेगळ्या संशोधनांची त्यांनी पाहणी केली.

अबू धाबीमधली मस्दर सिटी हे कचरा आणि प्रदूषण रहित आणि पूर्णपणे हायटेक असलेलं शहर आहे. त्यानंतर ते अबू धाबीचे पंतप्रधान आणि उपाध्यक्षांना भेटणार आहेत. विशेष म्हणजे या सिटीमध्ये पंतप्रधान आले ते ड्रायव्हरलेस कारमध्ये...ही कार मस्दर सिटीचं वैशिष्ट आहे. या कारमध्ये ड्रायव्हर नाही आणि पूर्णपणे प्रदूषणविरहित अशी ही कार आहे.

एवढंच नाहीतर मस्दरमधल्या हायटेक सिटीमध्ये मोदींनी एका टच स्क्रिनवर डिजीटल स्वाक्षरीसुद्धा केली. 'सायन्स इज लाईफ' म्हणजेच विज्ञान जीवन आहे, असं वाक्यही त्यांनी या स्क्रिनवर लिहिलं.

असा आहे ड्रायव्हर विरहित कारचा थाट !

या मस्दर शहराची आणखी एक ओळख म्हणजे तिथली प्रायव्हेट रॅपिड ट्रँझिट म्हणजेच PRT...आपल्याला पुण्याची बीआरटी माहीत आहे. त्याचप्रमाणे मस्दरमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी आहे PRT... पण, ही PRTचीही अनेक वैशिष्ट्य आहेत. ही लिथियम बॅटरीवर चालते. ही बॅटरी पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. म्हणजे त्यातून वायू प्रदूषण होत नाही. सौर्य ऊर्जेवर ती चार्ज होते.

या गाड्यांमध्ये ड्रायव्हर नाहीत. स्वॉफ्टवेअर गाईडच्या माध्यमातून ही गाडी चालते. त्यांच्यासाठी वेगळे ट्रॅक्स आहेत. हे ट्रॅक्स मॅग्नेटचे आहेत. आणि एका गाडीत फक्त सहा माणसं प्रवास करू शकतात. ही गाडी दिसायलासुद्धा अत्यंत देखणी आहे. फेरारी आणि बेन्टलीसाठी डिझाईन करणारे झॅगाटो या कंपनीनं या PRT च्या बसचं डिझाईन बनवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2015 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close