S M L

बँकॉक बॉम्बस्फोटाने हादरलं, 27 ठार

Sachin Salve | Updated On: Aug 17, 2015 08:50 PM IST

बँकॉक बॉम्बस्फोटाने हादरलं, 27 ठार

17 ऑगस्ट : थायलंडची राजधानी बँकॉक आज भीषण बॉम्बस्फोटाने हादरली. एका मंदिराजवळ झालेल्या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला असून 80 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

थायलंड टीव्ही रिपोर्टनुसार, बँकॉच्या मध्यवर्ती भागात हिंदू आणि बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्रम्हा मंदिरजवळ हा स्फोट झाला. या स्फोटात 15 लोकांचा मृत्यू झाला. घटनास्थळी हल्लेखोरांनी एका दुचाकीवर रिमोर्टद्वारे स्फोट घडवून आणला. घटनास्थळी पोलिसांनी दोन बॉम्ब निकामी केले आहे. हा परिसर खाली करण्यात आलाय. हा स्फोट का घडवण्यात आला आणि स्फोट घडवणारे हल्लेखोर कोण होते याचा पोलीस शोध घेत आहे. ब्रम्हा मंदिर हे बँकॉकमध्ये प्रसिद्ध असून बँकॉकच्या मुख्य व्यावसायिक केंद्राजवळ आहे. इथं हजारोंच्या संख्येनं बौद्ध श्रद्धाळू येत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2015 08:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close