S M L

दुबई लघु भारतच नव्हे तर लघु विश्व -पंतप्रधान

Sachin Salve | Updated On: Aug 18, 2015 03:15 AM IST

दुबई लघु भारतच नव्हे तर लघु विश्व -पंतप्रधान

17 ऑगस्ट : आधी मॅडिसन स्केवअर, नंतर चीन आणि आता दुबई....पुन्हा एकदा मोदी मोदी...जयघोष...!! आज यूएई दौर्‍यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईतील आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित समारंभात अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुबई फक्त एक लघु भारतच नाहीतर लघु विश्व आहे असे गौरवद्गार काढले. तसंच भारताच्या प्रगतीत दुबई राहणार्‍या भारतीयांचा मौलाचा वाटा आहे. त्यांच्यामुळे भारताचा जगात सन्मान वाढत आहे असंही मोदी म्हणाले. युएई भारतात चाडेचार लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे अशी घोषणाही मोदींनी केली.

ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं....असंच पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल म्हणावं लागेल. दुबईतील भव्य अशा क्रिकेट स्टेडिअममध्ये तब्बल 40 हजार लोकांच्या तोंडी एकच जयघोष होता तो मोदी....मोदी...! उत्साहाने भारावून गेलेल्या या सोहळ्यात पंतप्रधानांनी दुबईतील भारतीयांची कौतुकाने पाठ थोपाटली. भारत आणि दुबईच्या संबंधावर त्यांनी जोर देत सर्वांची मन जिंकून घेतली. आज दुबईत जगभरातील माणसं इथं राहतात. काय ताकद दाखवली या देशाने, किती सामर्थ्य आहे या देशात जेणे करून जगभरातून माणसं इथं एकवटली गेली. इथं गेल्या 10 वर्ष, 20 वर्ष तर कुणी 30 वर्षांपासून इथं काम करत आहे. आणि यात आता भारतीय लोकंही कमी नाही. दुबईत भारतीयांच्या व्यवहारामुळे, राहणीमान, संस्कृतीमुळे भारताचे नाव जगाच्या पाठीवर अभिमानाने घेतले जात आहे. भारतात जर पाऊस आला तर दुबईतील भारतीय छत्री उघडतो. भारतावर काही आपत्ती आली तर दुबईतील भारतीय नागरिक धावून येतात. ज्यावेळी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी अणुचाचणी घेतली होती तेव्हा जगाचे लक्ष वेधले गेले होते. पण या चाचणीमुळे अनेकांनी टीका केली. एवढंच नाहीतर भारताला अडचणी आणण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा वाजपेयींनी जगभरातील अनिवासी भारतीयांना मदतीचं आव्हान केलं होतं. तेव्हा याच खाडीतील देशातील भारतीय मजदूरांचे मोठे सहकार्य लाभले होते अशी आठवणही काढली.

दुबईत भारतातून आठवड्याला सातशे फ्लाईट्स मात्र भारताच्या पंतप्रधानाला दुबईत यायला 34 वर्षं लागली. दुबईमध्ये सन्मान, स्वागत मी हे प्रेम कधीच विसरणार नाही. हे प्रेम कुणा व्यक्तीवर नाही, हा सव्वाशे कोटी भारतीयांचा सन्मान, हा बदलत्या भारताचा सन्मान आहे असंही मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2015 11:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close