S M L

गृहराज्यमंत्री राम शिंदेंच्या कार्यालयाची संभाजी ब्रिगेडकडून तोडफोड

Sachin Salve | Updated On: Aug 18, 2015 05:07 PM IST

गृहराज्यमंत्री राम शिंदेंच्या कार्यालयाची संभाजी ब्रिगेडकडून तोडफोड

18 ऑगस्ट : अहमदनगरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयाच्या तोडफोड करण्यात आलीये. कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्यात. तसंच बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्याच्या विरोधात कार्यकर्ते रस्त्यावर पत्रके टाकून घोषणा देत कार्यकर्ते पसार झाले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारवरुन राज्यात वादंग माजलंय. नगरमध्ये तर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गृहराज्य मंत्री राम शिंदेंचं कार्यालय फोडलं, तूफान दगडफेकीत कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी पत्रक फेकून पोबारा केला. या पत्रकांमध्ये आज फक्त कार्यालयावर कारवाई, उद्या पुरंदरेला महाराष्ट्र भूषण देताल तर खबरदार, अशी धमकी देण्यात आलीये. या प्रकरणी पोलिसांनी घटणास्थळी पाहणी करुन पंचनामा केलाय. त्याचबरोबर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी सांगितलंय.

उस्मानाबादेत ठराव

दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुरस्कारावरुन निर्माण झालेला वाद आता ग्रामिण भागापर्यंत पोहोचलंय. त्यांना जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्याचा ठराव उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीनं केलाय. एकट्या लोहारा तालुक्यात 26 ग्रामपंचायतीन हा ठराव मंजूर केला आणि याच्या प्रती मुख्यमंत्र्यांना ई मेल करण्यात आलीये. या स्वरुपाची पाच हजार पत्रे मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे. पुरस्कार रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2015 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close