S M L

राज ठाकरेंच्या आरोपांना महत्व देत नाही, पवारांचा पलटवार

Sachin Salve | Updated On: Aug 18, 2015 05:23 PM IST

राज ठाकरेंच्या आरोपांना महत्व देत नाही, पवारांचा पलटवार

18 ऑगस्ट : राज ठाकरेंनी कुणाविषयी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. ते काय बोलतात याला मी महत्त्व देत नाही असा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज यांना फटाकरून काढलं. आजही अनेकांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्या नावाचा वापर करावा लागतो असा टोलाही शरद पवारांनी लगावला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरुन मोठा वादंग निर्माण झालाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर  तोफ डागली. या वादामागे पवारांचं गलिच्छ जातीचं राजकारण आहे. बाबासाहेबांवर तुमचा इतका आक्षेप आहे, तर मग तीन ते चार वेळा त्यांचा सत्कार का केला, अशी टीका राज यांनी केली होती. या वादामागे राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरच भाजपचेही काही मंत्री आहेत, असंही राज म्हणाले. तसंच बाबासाहेबांना कुणी हात लावला, त्यांना काही झालं तर याद राखा, अख्ख्या महाराष्ट्रीत तांडव करीन, असा इशाराही राज यांनी दिला. राज यांच्या टीकेचा शरद पवारांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. राज काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या आरोपांना महत्व द्यायची गरज नाही असं सांगत पवारांनी राज यांना फटकारलं. तसंच बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दलच्या वादावर पडदा पडावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2015 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close