S M L

हेच का अतिथी देवो भव: ?, अमेरिकन महिलेसमोर तरुणाचे अश्लील चाळे

Sachin Salve | Updated On: Aug 18, 2015 06:53 PM IST

 हेच का अतिथी देवो भव: ?, अमेरिकन महिलेसमोर तरुणाचे अश्लील चाळे

18 ऑगस्ट : 'अतिथी देवो भव:' असं म्हटलं जातं, मात्र याच पाहुणचाराला काळिमा फासणारी घटना घडलीये. कुलाबा भागात गेटवे ऑफ इंडियाजवळ अमेरिकन महिलेसमोर एका माणसानं अश्लील चाळे केल्याचा किळसवाणा प्रकार घडला.

मारियाना आब्दो या महिलेनं जेव्हा या माणसाला हटकलं, तेव्हा त्यानं पळून जायचा प्रयत्न केला. तिने तात्काळ त्या तरुणाचा फोटो काढला आणि तो ट्वीटरवर टाकला. ट्वीटरवर टाकताच फोटो व्हायरल झाला. तिचा हा फोटो 2300 जणांनी रीट्वीट केला. या ट्वीटची दखल थेट मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आणि पोलिसांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही महिला आज कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये अधिकृतरित्या तक्रार करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2015 06:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close